Official website of The Asiatic Society of Mumbai - Issue of New Books

Issue of New Books

मुंबईत ४५० वर्षांपूर्वी फुललेली ज्ञानाची बाग!

डॉ. मीना वैशंपायन - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
Published: Loksatta - Saturday, April 11, 2015

लोकसत्तातील लेखांची pdf फाईल..
--------------------------------------------------------------
गार्सिया द ओर्टा हा भारतात पोर्तुगीज डॉक्टर म्हणून आला, इथे अनेक ठिकाणी फिरला आणि वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासाला अनुभवाची जोड देऊन त्यानं एक ग्रंथ लिहिला! हा संवादरूप ग्रंथ केवळ वनस्पतींची नव्हे- माणसांची, आचारविचार आणि संस्कृतीची, नीतिमूल्यांचीही माहिती देतो. मुंबईत या गार्सियानं जी बाग फुलवली, ती आताच्या एशियाटिक सोसायटीच्या मागेच आहे.. पण या भागात कुणाला जाता येत नाही.. त्यानं फुलवलेली 'ज्ञानाची बाग'- त्याचं ते पुस्तक- मात्र 'एशियाटिक'मुळेच वाचकांसाठी पुन्हा उपलब्ध झालं आहे!
एके काळी निसर्गरम्य असणाऱ्या मुंबई बेटाच्या गेल्या पाचशे वर्षांच्या इतिहासाच्या पानांवर आरंभीच एका प्रेक्षणीय स्थळाची- बागेची- नोंद झालेली दिसते. ती म्हणजे आताच्या 'टाऊन हॉल' व 'एशियाटिक सोसायटी'च्या मागे असणाऱ्या 'मनोर हाऊस' सभोवतीच्या बागेची! ही बाग व ते मनोर हाऊस यांची माहिती sam10वा आठवण आज फारशी कुणाला असणं कठीणच आहे. ती बाग होती गार्सयिा द ओर्टा या वनस्पतिशास्त्रज्ञाची! कोण होता हा गार्सयिा द ओर्टा? आणि त्याचं ते वैशिष्टय़पूर्ण पुस्तक- 'कलोक्वीज ऑन द सिम्पल्स अ‍ॅण्ड ड्रग्ज ऑफ इंडिया'? त्याचं आणि 'मनोर हाऊस'चं काय नातं? ब्रिटिशकालीन अमलाआधीचा, पोर्तुगीज अमलाखालील सोळाव्या शतकातील भारत म्हणजे गार्सयिाची कर्मभूमी! पाश्चिमात्यांनी केलेले अत्याचार, भारतीय अस्मितेचे खच्चीकरण, धर्मातराची जबरदस्ती या बाबींची आठवण कुणाही भारतीयाला क्लेशकारकच आहे, पण विविध ज्ञानशाखांची व ज्ञानसंपादनाच्या विविध साधनांची ओळख करून देणारे, स्वत: त्यासाठी अपार कष्ट करणारे पाश्चिमात्यही आपण आठवायला हवेत. या दृष्टीने पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृती, ज्ञान यांच्यात त्या काळी झालेल्या देवाणघेवाणीत कळत-नकळत महत्त्वाचे साधन ठरलेला हा ग्रंथ व त्याचा कर्ता गार्सयिा यांचे स्मरण म्हणूनच करावेसे वाटते.
जवळपास पाचशे वर्षांपूर्वी, १५३४ मध्ये पोर्तुगालमधून भारतात, गोव्यात आलेला पोर्तुगीज डॉक्टर व वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणजे गार्सयिा द ओर्टा! त्याला वेगवेगळ्या झाडाझुडुपांचा अभ्यास करणं, त्यांच्यातील औषधी गुणधर्म तपासणं यांची विलक्षण आवड होती. पोर्तुगीज इंडियाचा गव्हर्नर म्हणून १५४२ मध्ये मार्टनि अल्फॉन्सो द सूसा याची नेमणूक झाली आणि त्याचा वैयक्तिक डॉक्टर म्हणून त्याचा डॉक्टर मित्र गार्सयिा त्याच्याबरोबर राहू लागला. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अनेक बंदरांना त्याने भेटी दिल्या. दीव, दमण, काठियावाड, अहमदाबाद आदी अनेक ठिकाणी गार्सयिा िहडत असे. तेव्हाचा राजा बहादूर शहा याच्याशी त्याची वैयक्तिक मत्री होती. त्याचप्रमाणे बहादूर निजाम शहा याच्याशी त्याचे चांगले संबंध होते आणि त्याच्या राजधानीत, अहमदनगर येथे त्याचे बरेच येणे-जाणे असे.
गोव्यामधील त्याच्या घराभोवती त्याने अनेक औषधी झाडे लावून सुंदर बाग तयार केली होती. १५५४ मध्ये गव्हर्नर सूसाने गार्सयिालाच मुंबई बेट दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टय़ाने दिले आणि गार्सयिाने तेथेही एक उत्तम बाग तयार केली. दुमजली घर बांधले. तेच हे मनोर हाऊस! ही बाग म्हणजे त्याची प्रयोगशाळाच होती जणू. येथे त्याने मुद्दाम अनेक झाडे लावली होती. त्या काळी मुंबईस (तेव्हाच्या बॉम्बेला) आताएवढे महत्त्व नसले तरी अनेक अंमलदार, विद्वान, लेखक, कलावंत इथे येत तेव्हा या मनोर हाऊसला त्यांनी भेट द्यावी असा शिरस्ता होता. तेथे गार्सयिाने स्वत:चे एक ग्रंथालयही ठेवलेले होते अशी नोंद आहे. आपल्या पुस्तकात येथील काही झाडांचा उल्लेख तो करतो. या बागेतील त्याने लावलेल्या आंब्यांना दोनदा फळे येत. एकदा डिसेंबरमध्ये व एकदा मेमध्ये असे सांगून तो पुढे निरीक्षण मांडतो की, मेमधील आंब्यांची चव डिसेंबरमधील आंब्यांना नसते. पुढे हे पोर्तुगीज 'मनोर हाऊस', ब्रिटिश 'कॅसल' झाले.

Read more: मुंबईत ४५० वर्षांपूर्वी फुललेली ज्ञानाची बाग!